जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ३०४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यात जळगाव शहरासह रावेर आणि पाचोरा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. तर आजच १७४ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये ३०४ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १०७ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या सोबत रावेर-२९; पाचोरा-२१; जळगाव ग्रामीण १५; भुसावळ-१९; अमळनेर-१०; चोपडा-१६; भडगाव-०५, धरणगाव-१८, यावल-६, एरंडोल-४; जामनेर-२१, पारोळा-०५, चाळीसगाव-१५, मुक्ताईनगर -९, बोदवड-४ असे रूग्ण आढळून आले आहे.
तालुका निहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- २००४, जळगाव ग्रामीण-३५२, भुसावळ-७०२, अमळनेर-५३६, चोपडा-५२४, पाचोरा-१९९, भडगाव-३१९, धरणगाव-३४१, यावल-३५५, एरंडोल-३६८, जामनेर-४७४, रावेर-५४८, पारोळा-३६६, चाळीसगाव-२२२, मुक्ताईनगर-२५३, बोदवड-२०६, इतर जिल्हे-२७ असे एकुण ७ हजार ७९६ रूग्णांची संख्या झाली आहे.
आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही ७७९६ इतकी झाली आहे. यातील ४८२६ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच १७४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ३९१ रूग्णांचा मृत्यू झाला असून २५७९ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.