जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेले अजून दोन नवीन रूग्ण आढळून आले असून यातील एक पाचोर्याचा तर दुसरा अमळनेरचा असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली असून या दोन्ही रूग्णांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप वाढतांना दिसत असून आज सकाळी प्रशासनाने दोन नवीन कोरोना बाधीत आढळल्याची माहिती एका निवेदनाद्वारे जाहीर केली आहे. यानुसार नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एक रूग्ण हा पाचोरा येथील 92 वर्षीय पुरूष आहे. तर एक अमळनेर येथील 90 वर्षीय महिला आहे. या दोन्ही रूग्णांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे
पाचोरा येथील पुरूष रूग्णाचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झालेला आहे .तर अमळनेर येथील कोरोना बाधित महिलेचा काल मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत करोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 24 झाली असून यापैकी नऊ रूग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, आजवर पाचोरा तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नव्हता. तथापि, या रूग्णाच्या मृत्यूमुळे पाचोर्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे आढळून आले आहे. तर अमळनेर येथील कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावत नसल्याचे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढीस लागली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००