जळगाव : प्रतिनिधी । कोकणात तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची भरपाई देण्यासाठी जे निकष आहेत त्या निकषांच्या आधारावरच जिल्ह्यातील केळी उत्पादकांना भरपाई मिळेल असे वाटते असे सूतोवाच आज पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी केले
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आयोजित प्रमाणपत्र सन्मानाच्या समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली . एका प्रश्नाच्या उत्तरात पालकमंत्री ना गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की , १९९२ सालात राम मंदिर आंदोलनात मी पण सहभागी होतो गिरीश महाजन यांना माझा एकच प्रश्न आहे की त्यांनी सांगावे की बाबरी मशीद नावाचा ढाचा पाडण्यात माझे शिवसैनिक सहभागी असतील तर मला त्यांचा अभिमान आहे असे सांगणारा नेता कोणत्या पक्षाचा होता ? याचा विचार करून हिंदुत्वाची व्याख्या करता येईल
गिरीश महाजन आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल ते म्हणाले की ते दोन्ही नेते आहेत गिरीश महाजन माजी मंत्री आणि भाजपचे नेते आहेत शरद पवार देशाचे नेते आहेत भेटी होत असतात भेट घेणे चुकीचे नसते काही कामानिमित्तच भेट होते असे नसते भेट झाली चांगली गोष्ट आहे .
काँग्रेसने निवडणुकांसाठी यापुढे स्वबळाचा नारा दिला आहे याबद्दल ते म्हणाले की , कोणी काहीही नारा देवो मी आदेशाचा कार्यकर्ता आहे नारा देण्यापेक्षा जनतेचा चारा महत्वाचा आहे जनतेच्या चाऱ्याची निकड महत्वाची आहे ते बघण्याची जास्त गरज आहे
अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की बी एच आर खूप मोठा विषय आहे एखादी बँक दुसऱ्या राज्यात नोंदणी करते तेंव्हा त्या बँकेवर केंद्र सरकारचे नियंत्रण येते त्यावेळी मी सहकार राज्यमंत्री होतो राज्याचा डी डी आर त्या बँकेवर प्रशासक असला तरी नियंत्रण पूर्ण केंद्र सरकारचे असते काही लोकांना अटक झाली हा तपासाचा भाग आहे ज्यांची चूक नाही ते तपासानंतर निर्दोष सुटतील , असेही ते म्हणाले .
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/393350095350797