जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोविड रूग्णालयाने पाठविलेल्या २२ अहवालापैकी ५ पॉझिटिव्ह तर १७ निगेटीव्ह आले आहे. यात पहूर येथील दोन व्यक्तींचा तर जळगाव, जामनेर व रावेर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ५२८ वर पोहचली आहे.
जिल्हा कोविड रूग्णालयाने जळगाव, जामनेर, पहूर, रावेर येथील २२ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १७ अहवाल निगेटिव्ह तर ५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पहूर येथील २ व्यक्तींचा तर जळगाव, जामनेर व रावेर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५२८ झाली आहे. त्यापैकी २१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. नागरीकांनी खबरदारी बाळगून घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केली आहे.