Home Cities जळगाव जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका आ. महाजनांच्या नेतृत्वात लढणार — जिल्हाध्यक्ष आ. भोळे

जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका आ. महाजनांच्या नेतृत्वात लढणार — जिल्हाध्यक्ष आ. भोळे

0
28

जळगाव, प्रतिनिधी  ।  येत्या आगामी निवडणूका (जिल्हा बँक, दूध संघ, नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती) जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री गिरिष महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी  प्रतिपादन केले. 

 

ते जिल्हा ग्रामीणच्या महत्वपूर्ण बैठकीत बोलत होते.  ही बैठक भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे शुक्रवार दि. २० रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. राजेंद्र फडके व माजी आ. स्मिताताई वाघ यांनी संघटनात्मक  विषयात मार्गदर्शन केले.  त्याच प्रमाणे संघटनात्मक आढावा जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील यांनी मांडला. जिल्हा परिषदेच्या सूचना जिल्हा सरचिटणीस मधुभाऊ काटे यांनी केल्या. आभार जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी मानले. या बैठकीला आ.मंगेश चव्हाण, जिल्हा परीषद अध्यक्षा ना.रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, सभापती ज्योती राकेश पाटील, उज्वलाताई म्हाडके, जयपाल बोदर्डे, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य उपस्थिती होते असे जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी यांनी कळविले आहे.

 


Protected Content

Play sound