Home क्राईम जिल्हा रूग्णालयासमोरून एकाची दुचाकी लांबविली

जिल्हा रूग्णालयासमोरून एकाची दुचाकी लांबविली


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या गेटजवळून एकाची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

धरणगाव शहरातील रहिवासी भिकन एकनाथ मराठे  (वय-४५) हे दवाखान्याच्या कामानिमित्ताने शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांची (एमएच  १९ डीसी ७७१५) या क्रमांकाच्या दुचाकीने जिल्हा रुग्णालयात आले होते. रुग्णालयाच्या गेटजवळ त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली. दुपारी १ वाजता काम आटोपून बाहेर आल्यावर रुग्णालयाच्या गेटजवळ लावलेली त्यांची दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने भिकन मराठे यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहेत.


Protected Content

Play sound