बोदवड प्रतिनिधी । जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दि. ८ मार्च रोजी बेरोजगारी विषयावर जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांनी बोदवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेसने युवा इंडिया के बोल या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बाबा खूप शिकला आणि घरीच असतो आता, हिंडतो दाही दिशांना प्रश्न माझ्या नोकरीचा तसेच साहेबांना सांगा आम्हा बेरोजगारांचे तुम्ही काय करायचे ठरवले आहे ? हे विषय भाषणासाठी देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व २९ फेब्रुवारीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी लागणार आहे.सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेतील दोन विजेत्यांना राज्यस्तरावर सहभागाची संधी मिळेल. प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे प्रथम ३ हजार, द्वितीय २ हजार व तृतीय १ हजार अशा स्वरुपाची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे आयोजन ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता विद्या प्रबोधनी, लेवा भवन समोर बीएसएनएल कार्यालयालगत जळगाव येथे करण्यात आले आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन प्रा. हितेश पाटील यांनी केले आहे.