जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करा – अल्पसंख्याक सेवा संघटनेची मागणी (व्हिडीओ )

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वस्त धान्य दुकान परवाना वाटपात आर्थिक गैरव्यवहार जिल्हा पुरवठा अधिकारी  सुनिल सुर्यवंशी यांची चौकशी करून निलंबीत करा अशी मागणी अल्पसंख्याक सेवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निर्देशने करून करण्यात आली.

 

जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी  सुनिल सुर्यवंशी यांनी स्वस्त धान्य दुकान वाटप करतांना आर्थिक व्यवहार करून स्वस्त धान्य परवाने वाटप करत असल्याबाबत तक्रार अल्पसंख्याक सेवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाचा आशय असा की, जिल्हा पुरवठा अधिकारी  सुनिल सुर्यवंशी हे जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षापासून तळ ठोकून आहेत. या अगोदर ते भुसावळपासून ते अनेक उपविभागीय अधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्यात कार्यरत आहे. तसेच ४ वर्षापासून जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून सद्या कार्यरत आहेत.  तसेच कोरोना काळापासून तर आजपर्यंत प्रधानमंत्री धान्य योजनेचे हजारो किलो धान्य सद्यस्थितीत गोडावूनमध्ये पडीत असून तसेच साखर पुरवठ्यावर व इतर पुरवठा श्री. सुर्यवंशी हे वेळेवर करीत नाहीत याची सुध्दा त्यांची सखोल चौकशी व्हावी व सुर्यवंशी हे समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनाही दमदाट्या करीत असतात याबाबत सी.आय. डी. चौकशी  करून अल्पसंख्यांक सेवा संघटनेतर्फे त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

कोरोना काळापासून आजपर्यंत श्री. सुर्यवंशी यांच्यावर अनेक आरोप प्रसिध्दी पत्रकात व आमदार, खासदार, मंत्री यांना तक्रारी देण्यात आल्यात पण ते कोणालाच जोमत नाहीत.  सुर्यवंशी यांच्याकडे व त्यांच्या नातेवाईकांकडे गैर संपत्ती अफाट जमवलेली असूनही ते स्वस्त धान्य दुकान परवाने वाटप करतांना २- ३ लाखाचा गैर व्यवहार करून परवाने वाटप झाला असल्यचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जहांगीर खान, महानगराध्यक्ष हुसेन खान, आयशा मणियार  आदी उपस्थित होते.

Protected Content