जळगाव प्रतिनिधी । यावल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका पदाधिकार्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील अनेक अधिकारी व पदाधिकार्यांना कोरोनाने ग्रासल्याचे दिसून येत आहे. याआधी जिल्हा परिषदेतील एका बड्या अधिकार्याला याची बाधा झाली असून त्यांनी यावर मात केली आहे. यानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील एका सभापतीने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यानंतर आता यावल तालुक्यातील एका पदाधिकार्याला कोरोनाची बाधा झाली असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. ही माहिती मिळताच राजकीय वर्तुळातून त्यांची विचारपूस सुरू झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. संबंधीत पदाधिकारी हे कोरोनावर मात करून लवकरच जनसेवेत रूजू होतील असा आशावाद त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.