जिल्हा न्यायालयाच्या आवारात दोन जणांमध्ये खटल्यावरून वाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात जुन्या वादाच्या कारणावरून चौघांनी येवून वयोवृध्दाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी २१ जुलै रोजी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिपक पुनाजी माने (वय-६१) रा. राजमालती नगर, दुधफेडरेशन जळगाव, हे आपल्या कुटुबियांसह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा संजू बिसमिल्ला पटेल (वय-४५)  याच्यासोबत दिपक माने यांच्या अतिक्रमणावरून जळगाव जिल्हा न्यायालयात केस दाखल आहे. गुरूवारी २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजता कोर्टाची तारीख होती. त्यामुळे दिपक माने हे जिल्हा न्यायालयाच्या आवारात आलेले होते. त्याच वेळी संजू पटेल हा आणि त्याच्यासोबत अनोळखी तीघेजण देखील न्यायालयाच्या आवारात आले. अतीक्रमण केसवरून संजू पटेल याने दिपक माने यांना धमकी दिली. याप्रकरणी माने यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ५ वाजता संजू पटेल आणि त्याच्या सोबत असलेले अनोळखी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content