जळगाव प्रतिनिधी । क्रीडा धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. जळगाव जिल्ह्यातही आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये या प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २ लाख ३ हजारांचा निधी वितरित केला आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य रहावे, नागरिकांमध्ये व्यायामाची आवड जोपासावी, खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाच्या दर्जात सुधारणा, खेळाडूंचा गौरव, दर्जेदार क्रीडा सुविधा या बाबी केंद्रबिंदू मानून खेळाडूंसाठी हितावह योजना राबवण्यासाठी क्रीडा धोरण तयार केले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. याासाठी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जिल्ह्याला २ लाख ३ हजार रुपयांचा निधी दिला आहे.