जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयात कोवीड पश्चात तपासणी कक्षाचे उद्घाटना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कोवीड रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर येवून पोहचली आहे. शासकीय निर्देशानुसार जिल्ह्यातील जिल्हा कोवीड रूग्णालयात कोवीड पश्चात तपासणी कक्षाची उभारणी करण्यात यावी. त्या अनुषंगाने सोमवारी दुपारी जिल्हा कोवीड रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी रूग्णालयाचे वर्ग ४ चे कर्मचारी दिलीप महाजन यांच्याहस्ते कोवीड पश्चात तपासणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या लढाईत आपण सर्व एक असून या महामारीची लवकरच नायनाट करू असा संदेश अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दिला. याप्रसंगी डॉ. मारूती पोटे, डॉ. गायकवाड, डॉ. इम्रान शेख, रूग्णालय अधिक्षक डॉ. सोनार, स्वप्निल चौधरी, श्रीमती जोशी, स्वच्छता निरीक्षक बापु बगलाने, मुकादम सुधिर करोशिया, जितेंद्र करोशिया, राजू सपकाळ, अनिल सपकाळ यांच्यासह वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.