जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय तथा कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला ८० वर्षीय संशयित वृद्ध शुक्रवारी बेपत्ता झाला होता. शनिवारी हा रुग्ण पाचोरा येथे आढळून आला. त्याला खाजगी हौसपिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पाचोरा येथील रहिवासी असलेल्या ८० वर्षीय वृद्धाला त्रास होऊ लागल्याने संशयित म्हणून दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू होते.दरम्यान शुक्रवारी सकाळी सदर इसम वार्डातुन बेपत्ता झाला. प्रशासनाकडून त्याचा शोध घेतला असता मिळून न आल्याने रात्री ९ वाजता तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान आज हा रुग्ण पाचोरा येथे आढळून आला. पोलिसानी त्याला तत्काळ विघ्नहर्ता हौस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले.