जळगाव, प्रतिनिधी । जिल्हास्तरीय ओबीसी हक्क परिषद शनिवार २५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनांची बैठक घेण्यात आली. या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून ना. छगनराव भुजबळ, ना.धनंजय मुंडे, आ. कपिल पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर, ओबीसी संघटनेचे जेष्ठ नेते शकील अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आज ओबीसी आरक्षण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाभरातील बराबलुतेदार व मुस्लीम ओबीसी प्रतिनिधी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. यावेळी लोकसंघर्ष मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी सांगितले की, देशात ओबीसींच्या नावावर राजकारण केले जात आहे. संपूर्ण देश हा ओबीसीच्या राजकारणात घोळून निघतो आहे.याचा प्रथम मारा महाराष्ट्रातील राजकीय आरक्षणावर बसला आहे. यापुढे शिक्षण, नोकरी व आर्थिक आरक्षणावर देखील घाला टाकला जाणार आहे.याची गरज जळगाव जिल्ह्यातील सगळ्या ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधी व बुद्धीजीवींना यांना वाटली म्हणून समन्वयाची बैठक आयोजन करण्यात आले होते. ओबीसी आरक्षण हक्क हा एका परिषदेपुरता मर्यादित न राहता जिल्हाभर वातवरण तयार व्हावे यासाठी ती सर्वसमावेशक असावी यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीतर्फे २५ तारखेला सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हाव्यापी ओबीसी आरक्षण हक्क परिषद घेण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे ना.छगनराव भुजबळ, ना.धनंजय मुंडे, आ. कपिल पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर, ओबीसी संघटनेचे जेष्ठ नेते शकील अन्सारी हे राहणर आहेत. उद्यापासून सर्व तालुक्यांमध्ये ओबीसी आरक्षण हक्काबाबत प्रबोधन करण्यात येणार असल्याचे प्रतिभाताई शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी फारुख शेख, अॅॅड. विजय पाटील, करीम सालार , संजय पवार, उमेश नेमाडे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/895174157766741