जळगाव प्रतिनिधी । भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना अज्ञात व्यक्तीने मोबाइलवर एसएमएस पाठवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याचा शहरातील भाजपातर्फे निषेध व्यक्त करत पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना निवेदन देवून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर एसएमएस पाठवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून ह्या धमकीचा निषेध भारती जनता पार्टी केला. या धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तपास लावून त्याच्यावर कार्यवाही व्हावी व लवकरात लवकर तपास लावावा असे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना आमदार सुरेश भोळे यांनी दिले. याप्रसंगी भाजप आमदार सुरेश भोळे (राजूमामा), जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, गणेश माळी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.