जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेल : आ. राजूमामा भोळे (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । मला दिलेल्या संधीचे सोने करणार, बूथ प्रमखापासून ते प्रदेशस्तरावतील नेत्यांसोबत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन नवनियुक्त भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी केले. ते ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’सोबत बोलत होते.

आ. भोळे यांनी पुढे सांगितले की, ते सर्वांना बरोबर घेऊन काम करतील. तसेच संघटना बळकटीकरणासाठी जुने व तसेच नवीन लोक कसे जोडले जातील याकडे विशेष लक्ष देणार आहे. समाजातील सर्वच घटक जसे शेती, उद्योग, युवक आदींचे प्रश्न राज्य तसेच केंद्र सरकारकडे मांडून सोडवू त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल. आ. भोळे यांनी त्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री एकनाथराव खडसे, संघटक किशोर काळकर, सर्व नेते, खासदार व आमदार, कार्यकर्ते, मंडळ अध्यक्ष यांचे आभार मानले आहे. दरम्यान, आ. भोळे यांची भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवड झाल्याबद्दल सोनार समाजातर्फे संजय विसपुते, विजय वानखेडे यांनी व श्रीनिवास व्यास, राजू बांगर, दिपक मुंदडा, जोशी साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1591681544343657/

 

Protected Content