जळगाव, प्रतिनिधी । जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज केले होते. या बैठकीत त्यांनी जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांना विविध सूचना केल्यात. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष धनराज चौधरी उपस्थित होते.
जनरल प्रॅक्टिशनर यांनी आवश्यक रुग्णांना नमुने संकलनासाठी सरकारी केंद्रात पाठवावे. जे नागरिक गुंडगिरी करतील, दवाखाने फोडतील, डॉक्टरांना मारहाण करतील त्यांच्यावर सरकारी पद्धतीने कारवाई केली जाईल असे सांगून जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिलासा दिला. बैठकीत डॉक्टरांनी त्यांची बाजू मांडतांना सांगितले की, .नागरिकांना कोरोना तपासणी करा सांगणे आवडत नाही. ते डॉक्टर बदलून दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. डॉक्टरांनी सांगूनही रुग्ण नमुना संकलनासाठी जात नाही. सुरुवातीला गाडीलकर यांनी कोरोनाचा मृत्युदर कमी करणे व रुग्ण पहिल्या पायरीवरच ओळखणे हा शासनाचा उद्देश असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी राऊत यांनी याप्रसंगी सांगितले की, डॉक्टरांचे तळागाळात कार्य चालते. रुग्णाला कोरोनाचे लवकर निदान व्हावे व तो वाचवा हा आपला हेतू आहे. तो लवकर अलगीकरण झाला तर इतर आजूबाजूचे 15 जण तो वाचवतो. मात्र रुग्ण उशिरा येतो मग शासकीय कोविड रुग्णालयात केलेल्या सुविधांचा काय उपयोग ? डॉक्टरांवर प्रशासन कुठलेच गुन्हे विनाकारण दाखल करीत नाही. जर रुग्ण सहकार्य करणार नाही तर त्यावर गुन्हा दाखल करू. रुग्णाला उचलून घेऊन जातात हा प्रकार आता नाही. कोरोनाबधित गृह विलगिकरण झाल्यास जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर त्यांच्यावर घरी जाऊन उपचार करू शकतात. बोगस डॉक्टरवर भरारी पथकाद्वारे नजर ठेवून असून कडक कारवाई केली जाईल. ग्रामीण भागात रुग्णावर कोविड दक्षता केंद्रात उत्तम उपचार होताहेत. भडगावचे दक्षता केंद्रात बरे होण्याचे प्रमाण तब्बल 98 टक्के आहे. रुग्णांना तीन पर्याय आहेत. गृह विलगिकरण, दुसरा मनपाचे कोविड दक्षता केंद्र आणि तिसरे खाजगी असलेले भरारी फाऊंडेशन, जीएम फाऊंडेशन, जितो इंटरनॅशनल संस्थांचे कोविड दक्षता केंद्र याठिकाणी ते उपचार घेऊ शकतात. डॉक्टरांना कोणी त्रास देऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कारवाईसाठी सूचना देण्यात येतील, असेही ते म्हणाले. बैठकीला 40 डॉक्टर उपस्थित होते.