जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक कामगार समितीच्या वतीने सुरक्षा रक्षकांच्या न्याय व हक्कासह विविध मागण्यांसाठी आज सोमवार २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाध्यक्ष रूपचंद चौधरी सह अन्य जणांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली.
धुळे जिल्हा सुरक्षा मंडळाच्या अंतर्गत असलेल्या जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील मंडळाची स्थापना राज्य शासनाने महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक करण्यात आली आहे. यासाठी अधिक्षक अभियंता, महापारेषण कंपनी, सवसू मंडळ, भुसावळ-खडका आणि जळगाव ही आस्थापना मंडळामध्ये मुख्य मालक म्हणून नोंदीत आहेत. या मंडळाच्या अधिनियम आणि योजनेच्या तरतूदी महापारेषण कंपनीला अस्थापनेपासून लागू असून बंधनकारक आहेत. मंडळात सुरक्षा रक्षक भरणे अनिवार्य असूनही याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही भरती झालेली नाही. दरम्या आजपर्यंत ठेकेदारी पध्दत सुरू आहे. याला मंडळ अस्थापनेस अनुकुल वातावरण तयार करण्यास मदत करत आहे. वेळीवेळी या ना त्या कारणावरून अटी व शर्तीचा बहाणा दिला जात आहे. तरी शासनाने याची दखल घेवून महापारेषण कंपनीने मंडळास सुरक्षा रक्षकाची केलेली मागणीवर विचार करून संबंधितांना न्या मिळूवन द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष रूपचंद चौधरी, सचिव किशोर तायडे, धुळे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, सचिव मनोज ढिवरे, नंदूरबार जिल्हाध्यक्ष कृष्ण गावळे, जिल्हा सचिव कपिल पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.