जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचे सावट असल्याकारणाने राज्यसरकारने नियमावली आखून दिली आहे. मंदीरांप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी भीमसैनिकांसाठी खुल करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
आगामी काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याकारणाने हजारो भीमसैनिक दादर येथील चैत्यभूमी येथे दर्शनासाठी जात असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याकारणाने राज्यसरकारने नियमावली आखून दिली आहे. ज्याप्रमाणे शासनाने धार्मिक स्थळ उघडायला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे शासनाने फेरविचार करून चैत्यभूमी येथील पावन स्थळ दर्शनासाठी भीमसैनिकांना खुले करून देण्यात यावे. या मागणीसाठी आज रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मिलिंद सपकाळे, रमाबाई ढीवरे, प्रताप बनसोडे, सागर सपकाळे, भरत मोरे, रोहित गायकवाड यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/733063400899614/