Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. राजीव गांधी यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. राजीव गांधी यांना अभिवादन


जळगाव, प्रतिनिधी । येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रविण महाजन यांनी माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, उप जिल्हा निवडणुक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, नायब तहसिलदार रविंद्र मोरे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound