जळगाव, प्रतिनिधी । येथील वैद्यकीय अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आपसी वादाने जळगाव येथील रूग्णांची अतिशय दयनीय अवस्था होवून जळगावचा मृत्युदर सर्वात जास्त आहे. तरी योग्य ती चौकशी करून दोषी व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई करून जळगावकरांना न्याय द्यावा,अशी मागणी गजानन मालपुरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव येथील सी विंग, गणगोपी अपार्टमेन्टमधील रहिवासी गजानन मालपुरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव वैद्यकीय अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यात वाद असल्याने जळगावातील रुग्णांची हेळसांड झालेली आहे त्यामुळे यांची तात्काळ बदली करून निष्पक्षपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. जिल्हा रुग्णालय येथे गोरगरीब जनता येत असतांना हे रूग्णालय १७ कि.मी. दूर जेव्हा की लॉकडाऊन असल्यामुळे कुठल्याही व्यवस्था ने-आण नसतांना नेण्याचे मागचे कारण काय? जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात ८ ते १० व्हेंटीलेटर आहे व गोदावरी महाविद्यालयात ५० व्हेंटीलेटर असतांना कोरोना हॉस्पीटल गोदावरी हॉस्पीटलला का हलविण्यात आले नाही. जेव्हा की कोरोना रूग्ण हा गावाबाहेर असला पाहिजे तरी या साध्या सरळ गोष्टींचा विचार न करता कोरोना हॉस्पीटल गावात ठेवण्यात आले. जळगाव जिल्हा रूग्णालयात व वैद्यकीय रुग्णालयात जे कोरोना रूग्ण आहे त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यांचे खाणे-पिणेबाबत योग्य ते नियोजन नसल्याचे अनेक व्हीडीओ व्हायरल झालेले आहेत. तसेच जळगाव जिल्हा रूग्णालय व महाविद्यालयाचा रूग्णांसाठी आहाराबाबत ठेका दिलेला असतांना प्रशासनामार्फत गोदावरी कॉलेजला १७ कि.मी. अंतरावरून फूड पॅकेट पाठविले जात होते. जेव्हा की वैद्यकीय महाविद्यालय शासनाकडून करोडो रूपयांची अनुदान मिळत आहे. अशा संकट काळी हे महाविद्यालय रूग्णांच्या कामात येत नसेल तर याची मान्यता रद्द का करण्यात येवू नये अशी मागणी केली आहे. खुल्या बाजारात ५०० ते ६०० रूपयांत पीपीई कीट मिळत असतांना वैद्यकीय महाविद्यालयात रूणांकडून जवळपास १३०० रूपये वसूल करण्यात आलेले आहेत व अवाच्या सव्वा बिले देखील घेण्यात आलेले आहे याची रूग्णांची नावे व पत्ते काढून समिती नेमून चौकशी करण्यात यावी व दोषी व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. जळगावात महात्मा फुले सारख्या योजना अनेक खाजगी रूग्णालयांना दिलेले असतांना व त्यांनी शासनाने अनुदान घेतलेले असतांना ते रूग्णालय अनुग्रहीत न करता इतर रुग्णालयांना अवाच्या सव्वा भाडेतत्त्वावर का घेण्यात आले याची शहानिशा करण्यात यावी. तसेच कोरोना बाधीत काळात अनेक गोष्टींचा खरेदी करण्यात आली आहे त्या देखील अवाच्या सव्वा खरेदी करण्यात आली आहे याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली श्री. मालपुरे यांनी आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे केली आहे.