पारोळा,प्रतिनिधी| अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिराईत शेतकऱ्यांना बागायती प्रमाणेच नुकसान भरपाई द्यावी व फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीच्या यादीत त्यांना समाविष्ट करण्याची मागणी शिवसेनेने तहसीलदार अनिल गवांदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्तांना मदत देण्याबाबत १३ आक्टोंबर २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मदत प्रदान करण्यात आली. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टरी १०,०००/- रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टरी १५,०००/- रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टरी २५,०००/- रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. त्याअनुषंगाने एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा, एरंडोल व भडगांव तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना देखील जिरायत पिकांच्या नुकसानी यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. तसेच बागायतदार शेतकरी यांच्या उताऱ्यांवर विहीर लावण्यात आलेली आहे. तसेच बागायती पिकांचे कर्ज देखील तालुक्यांतील शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा अध्याप करण्यात आलेले नाही. कुठलीही मदत संबंधित शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सदरील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून बागायतदार शेतकऱ्यांना जिरायत पिकांचा लाभ न देता त्यांना बागायत पिकांच्या नुकसानी यादीत समाविष्ट करून मदत देण्यात यावी. व फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना बहुवार्षिक पिकांच्या नुकसानी यादीत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसील अनिल गवांदेयांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
याप्रसंगी पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील सर, बाजार समितीचे उपसभापती दगडू पाटील, संचालक चतुर भाऊसाहेब पाटील, मधुकर पाटील, प्रा.बी.एन.पाटील सर, प्रेमानंद पाटील, जिजाबराव पाटील, डॉ.पी.के.पाटील, शेतकी संघाचे चेअरमन अरुण पाटील, संचालक चेतन पाटील, नाना पाटील, आधार पाटील, सुधाकर पाटील, राजेंद्र पाटील, पंडित पाटील, भैय्यासाहेब पाटील, पंडितराव पाटील, रामदास पाटील, राजेंद्र पाटील, भरत पाटील, छगन पाटील, दिलीप माळी, तान्हीराम पाटील, गणेश पाटील, लक्ष्मीकांत पाटील व अनंतकुमार पाटील आदी उपस्थित होते.