जालना वृत्तसंस्था । जालन्यात संशयित कोराना रूग्णाचा मृत्यू झाला होता. मृत्यू नंतर संशयित मयत रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने अंत्यसंस्काराला उपस्थित आलेल्या ९० त १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जालना शहरातील मोदीखाना येथील वृद्धाचे १ जून रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा सरकारी रुग्णालयाने या वृद्धाचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. त्यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच जालना शहरातील एका स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उरकण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमानुसार २० लोकांनी एकत्र येणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे अपेक्षित होतं. मात्र हे माहीत असतानाही आदेशाचे उल्लंघन करत ९० ते १०० जणांनी या अंत्यविधीला उपस्थिती दर्शवली. अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशी मयत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
जालन्यात कोरोनाचे १५९ रुग्ण
सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या फिर्यादीवरुन अंत्यसंस्कारास उपस्थित राहणाऱ्या ९० ते १०० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यात कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या 159 वर पोहोचली आहे. जालना शहरातील मोदीखाना भागातील 4, मंठातील 1, खासगी हॉस्पिटलमधील कर्मचारी म्हाडा कॉलनीतील 1 अशा एकूण सहा संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड यांनी दिली.