जामिया ग्रंथालय हिंसाचाराचा व्हिडीओ व्हायरल ; प्रियंका गांधींची केंद्र सरकारवर सडकून टीका

PRIYANKA GANDHI

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली पोलिस अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना अंदाधुंदपणे मारहाण कसे करतात ते पहा?. एक मुलगा पुस्तक दाखवत आहे, पण पोलिस लाठी चालवत आहेत. गृहमंत्री आणि दिल्ली पोलिस अधिकाऱी खोटे बोलत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, जामियामधील हिंसाचारावर कोणतीही कारवाई केली गेली नाही तर सरकारचा हेतू पूर्णपणे देशासमोर येईल, अशा शब्दात काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे.

 

जामिया मिलिया विद्यापीठातील ग्रंथालयात पोलीस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करताना दिसत असल्याचा व्हीडीओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका सुरु झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ग्रंथालयात घुसलेले पोलीस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करताना स्पष्ट दिसत आहेत. जामिया कॉर्डिनेशन समितीकडून हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर ट्विटरवर ट्रेन्ड होणे सुरू झाले आहे. काँग्रेस पक्षानंही दिल्ली पोलिसांवर खोटं बोलण्याचा आरोप करत लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाची मागणी केली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेतली असल्याचे जाहीर केले आहे.

 

Protected Content