जामनेर प्रतिनिधी | शहरातील एकलव्य माध्यमिक विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी ‘मोफत कोरोना लसीकरण शिबिर संपन्न झाले. या शिबिरात सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
शहरातील एकलव्य माध्यमिक शाळा व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १८ वयोगटातील शहरातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी ‘एकलव्य माध्यमिक विद्यालयात मोफत कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरपालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, दीपक पाटील, सुहास पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.दानिश खान, डॉ.विनोद भाई, एकलव्य शाळेचे प्राचार्य सोनवणे, मुख्याध्यापक काळे, आरोग्य विभागाचे पुंडलिक पवार, ज्ञानेश्वर महाले, किशोर पाटील, धीरज राजपूत, मीरा पांढरे, दिपाली माळी, ज्योती येंदे, निशा डोंगरे, स्नेहल पाटील आदी. यावेळी उपस्थित होते. या लसीकरणात सुमारे पाचशेच्या वर मुला मुलींनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
जामनेर तालुक्यात दि. ३ जानेवारी पासून वय वर्षे १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू झाले. या वयोगटातील लसीकरणाला गती मिळावी व अधिकाधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण व्हावे या उद्धेशाने आज एकलव्य शाळा शिवाजी नगर येथे कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण विभागाकडून शाळांचा दैनंदिन लसीकरणाचा आढावा घेण्यात येतो. शाळांनी आपापल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे शाळेत लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेले आहे. जानेवारी अखेरपर्यंत शाळांना इ. ९ वी ते १२ वी चे १०० % लसीकरण पूर्ण करायचे आहे अन्यथा संबंधित शाळांना नोटीस बजावण्यात येणार आहे. पुढे परीक्षांना लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा शासनाचा विचार आहे