जामनेर प्रतिनिधी । कोरोना विषाणू फैलाव कमी व्हावा यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील १७ भाजीपाला विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे येथील आठवडा बाजार आज बंद असतांना देखील सकाळच्या ११ पासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या काळात अत्यावश्यक सेवा यांना जामनेरात सुट दिली. मात्र त्याचा गैरफायदा काही भाजीपाला व फळविक्रेत्यांनी चालते ठेले न लावता दुकाने लावली. या दुकानदारांनी कुठल्याच प्रकारचा सोशल डिस्टन्सचा नियम पाळला नाहीच तर अनेकांनी मास्क देखील न लावल्याने नगर पालिका प्रशासनाने नियमांना धाब्यावर ठेवणाऱ्या १७ भाजीपाला व फळविक्रेत्यांवर आज कारवाई केली.
सर्वत्र लॉकडाऊन असतांना जिल्हाधिकारी यांनी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश असतांना देखील काही विक्रेत्यांनी आज नियमांचे उल्लंघन केले आहे. यामुळेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील व त्यांच्या पथकाने या विक्रेत्यांचा माल जप्त करीत वजन, मापे देखील जमा करून घेतले असून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले.