जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खा. रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून रावेर मतदारसंघातील सर्व तालुक्यातील अपंग बांधवांना सुमारे १० कोटी रुपयाचे विविध साहित्य वाटप केले जाणार आहे. यासाठी शिवजयंती निमित्त जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन व खा. रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत अपंग बांधवांच्या तपासणी व नोंदणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. रक्षा खडसे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, एडवोकेट शिवाजी सोनार, तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, डॉ.आर.के. पाटील, नवल पाटील, रवींद्र झाल्टे यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी डॉक्टर व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सबका साथ सबका विकास विविध कार्यक्रम देशात राबवले जात असून या माध्यमातून अपंग बांधवांना विविध साहित्य मिळाल्यानंतर त्यांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले.