जामनेर प्रतिनिधी । कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर मदतनिधी म्हणुन तालुका भारतीय जनता पक्षातर्फे प्रधानमंत्री फंडासाठी १० लाख रूपये देण्यात आले.
या रकमेचा धनादेश तहसिलदार अरूण शेवाळे यांच्याकडे सोपविण्यात आला. धनादेश सुपुर्द करतेवेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितु पाटील, तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे,शहराध्यक्ष तथा नगरसेवक आतीष झाल्टे, संजय सुर्यवंशी,दिपक तायडे आदी पदाधीकारी होते.