जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोणतेही कारण नसताना ईडीने नोटीस बजावून चौकशीसाठी त्रास देण्याचे काम सुरू असून या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी जामनेर तालुका काँग्रेस पार्टी तर्फे तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन लोखंडे, ज्योतना विसपुते, शंकर राजपूत, मूलचंद नाईक, अशपाक पटेल, संजय राठोड, गणेश झाल्टे, सोनू सिंग राठोड, अमित पाटील, जगदेव बोरसे, नाना पाटील, मुसा पिंजारी, प्रवीण पाटील, सुनील घुगे, राजू नाईक, डॉ. ऐश्वर्या राठोड, संजय चव्हाण, पांडुरंग मिस्त्री, शरद सोनवणे, ईश्वर रोकडे, प्रकाश पाटील, माधव होळी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
देशामध्ये केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून विरोधकांना नमो धरण करण्याचे काम केले जात आहे. त्याचबरोबर विरोधक संपवण्यासाठी केंद्राच्या वतीने ईडीच्या वापर करून इतर पक्षाच्या लोकांना विनाकारण त्रास देण्याचे काम सुरू आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना समर्थन देण्यात आले आहे.