जामनेरात स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन

जामनेर – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी |हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्षा साधना महाजन यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील नगरपालिका चौकात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची ११० वी जयंती साजरी केली जात आहे. त्यानुसार शहरातील नगरपालिका चौकात नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते वसंतरावजी नाईक यांची प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र बाविस्कर, जे. के. चव्हाण, शंकर राजपूत, रमेश नाईक, उत्तम राठोड, तुकडोदास नाईक, मुलचंद नाईक, राजेश नाईक, दौलत पवार, रामकिसन नाईक, निलेश नाईक, माणूस चव्हाण यांच्यासह बंजारा समाज बांधव, नागरिक व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content