जामनेर, प्रतिनिधी | कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शहरात विना मास्क धारकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई नगरपालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त केली.
सध्या देशासह राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर जामनेर शहरांमध्ये पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन व नगरपालिकेच्या वतीने विना मास्क धारकांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये सोमवार रोजी एका दिवसात सुमारे दोनशे जनावर कारवाई करण्यात आली. विना मार्क्स फिरणार्या १०१ जनांवर कारवाई करून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर दुसरीकडे शहरात वाहतुकीचे पालन न करणाऱ्या दुचाकी धारकांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये लायसन नसणे, ट्रिपल सीट हेल्मेट न वापरणे, त्याचबरोबर दुचाकी वाहन आला नंबर पेठ नसणे अशा १०५ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ३८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल विजय जोशी, शिवाजी पाटील, नितीन जाधव, निलेश घुगे, तुषार पाटील, श्याम काळे या पथकाने केली. यापुढे अशा प्रकारे जामनेर शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर व मास्क न वापरणाऱ्या वर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिनिधीशी बोलताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली.