जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी विजयानंद हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देहदान व नेत्रदान संकल्प भरून घेण्यात येणार आहे. नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यंदा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. दरवर्षी डॉ. नंदलाल पाटील यांच्या विजयानंद हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्यासोबत आता देहदान व नेत्रदान संकल्प फॉर्म देखील भरून घेतले जाणार आहेत. मनुष्याचा देह मरणानंतरही कामात आला पाहिजे, तसेच जे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतात त्यांच्या अभ्यासासाठी देह कामात येतो. त्यामुळे चांगले डॉक्टर्स घडण्यास मदत होते.
यासह नेत्रदान केल्यास गरजू व्यक्तीस नेत्र मिळाले तर तो हे सुंदर जग आपल्या डोळ्यांनी बघू शकतो या उदात्त भावनेने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना देहदान व नेत्रदान करण्याची इच्छा आहे त्यांनी, सकाळी ८.०० ते दुपारी १.०० पर्यंत डॉ. नंदलाल पाटील (९७३०२९७५३९), डॉ. मोहिनी मोरे (८४८५०८२२८२), डॉ. नजमोद्दीन तडवी (७४९९६६३७१६), भीमराव दाभाडे (७९७२३८८२७०), प्रल्हाद बोऱ्हाडे (९४२२४९४९३१), डी.एस.पाटील (९४२०३८६९३२), रमेश गायकवाड (९४०४५९५६९९), यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.