जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी व भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराज बाबाचा वादग्रस्त वक्त केल्यामुळे जामनेर तालुका महाविकास आघाडी तर्फे जोडा मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला.
भारत देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत भगतसिंग कोशारी यांनी शिवाजी हे जुने झाले व आताचे हिरो गडकरी आहे असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे तर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच सहा वेळा माफी मागितलीअसे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यपाल कोशारी व सुधांशू त्रिवेदी यांचा जाहीर निषेध जामनेर शहरातील नगरपालिका चौकात महाविकास आघाडी तर्फे करण्यात आला. यावेळी त्यांच्या पोस्टरला जोडा मारून आंदोलन करण्यात आले सदर भगतसिंग कोषारी यांना पदावरून बरखास्त करावे व भाजपचे प्रवक्ते सुदांची त्रिवेदी यांना पक्षातून हाकार पट्टी करा अन्यथा तीव्र आंदोलन घेण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे महाविकास आघाडी तर्फे करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरुड, तालुका अध्यक्ष विलास राजपूत, युवक तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, जिल्हा बँक संचालक नाना पाटील, माधव चव्हाण, अरविंद चितोडिया, संतोष झाल्टे, वासुदेव पालोदे, सुभाष बडरूपे, संदीप हिवाळे, विनोद माळी, दत्ता साबळे, विशाल पाटील, नटवर चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, संजय राठोड, अमोल पाटील, आरिफ शेख, शिवसेनेचे दीपक राजपूत, सुधाकर सराफ, अतुल सोनवणे, पवन माळी, हिम्मत राजपूत, वैभव बोरसे, सौरभ अपार, ईश्वर रोकडे, मोहन चौधरी, सोनूसिंह राठोड, राजेश माळी, दिलीप सोनवणे, कैलास माळी, संतोष झाल्टे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.