जामनेर प्रतिनिधी | शहरामध्ये प्रथमच कमल हॉस्पिटल व कमल फाउंडेशनच्या माध्यमातून गुडघ्याच्या आजारावरील निदानासाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी सुमारे ७५ रुग्णांची तपासणी करून आठ रुग्णांवर मोफत दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती कमल हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत भोंडे यांनी दिली आहे.
जामनेर येथील कमला हॉस्पिटलच्या माध्यमातून व कमल फाउंडेशनच्या सहकार्याने गुडघेदुखीच्या आजारा संदर्भात रुग्णांची मोफत तपासणी डॉ. प्रितेश कोठारी (भुसावळ) व डॉ. प्रशांत भोंडे यांनी केली. यावेळी ७५ रुग्णांची तपासणी करून गुडघ्यांच्या आजारा संदर्भात मोफत औषधी उपचार करण्यात आला. यावेळी ८ रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असून ते आठही रुग्णांवर मोफत दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पहिल्यांदाच जामनेर शहरांमध्ये गुडघेदुखी या आजाराची तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आल्यामुळे अनेक गरजू गरीब रुग्णांना याचा लाभ घेता आला. सदर शिबिर पार पाडण्यासाठी जामनेर कमल हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत भोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. प्रितेश कोठारी, डॉ. गिरधारी वेद, डॉ. भावना नाईक, डॉ. प्रियंका राजपूत, राजू पाटील, वैभव वागणे, गजानन भिंगारे, प्रितेश विसपुते, सुनील शिंदे, पीयूष गायकवाड यांच्यासह कमल फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.