जामनेरच्या कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पदी शंकर राजपूत

जामनेर, प्रतिनिधी | कॉंग्रेस पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या शंकर शिवलाल राजपूत यांची नुकतीच जामनेरच्या कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

मुंबई येथे कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जामनेर येथील शंकर शिवलाल राजपूत यांची कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्रही त्यांनी राजपूत यांना दिले आहेत. याबाबत राजपूत यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकर राजपूत यांनी 1990 पासून पक्षाच्या कामाला सुरुवात केली होती. आजपावेतो त्यांनी तालुका युवक काँग्रेस कार्याध्यक्ष पद भूसवले आहे. त्याचबरोबर पक्षवाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले असून याची दखल घेत काँग्रेस आय जामनेर तालुका अध्क्षपदी शंकर शिवलाल राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. यापुढे जामनेर तालुक्यात काँग्रेस आय पक्ष वाढीसाठी झटणार असून गाव तिथे शाखा अभियान राबवणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे. पक्षवाढीसाठी काम करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित तालुकाधक्ष शंकर राजपूत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. काँग्रेस आय हा सर्वात जुना पक्ष असून आज महाराष्ट्र राज्यामध्ये आघाडीसोबत सरकार मध्ये काम करीत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये जर काँग्रेसचे वरिष्ठांचा आदेश आला तर यांनी स्वतंत्र निवडणूक लढू अशी माहिती पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन दादा लोखंडे सांगितले आहे.

यावेळी विमुक्त जाती जमाती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन लोखंडे, सोनूसिंग राठोड, संजय राठोड, जगदेव बोरसे, विजय पाटील, रउप शेख, राजू मोगरे, विलास पाटील, पंकज पाटील, बंटी पाटील व संदीप पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content