अमरावती वृत्तसंस्था । कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. तर ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याची काही गरज नव्हती. कारण यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते, त्याशिवाय, उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन, जानेवारी महिन्यापासून शाळा सुरु करण्यात याव्या, असा प्रस्ताव मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे यांना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले
“कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरु झाल्या नाहीत. तर ऑनलाइन शिक्षण चालू करण्याची काही गरज नव्हती. कारण, यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते. शिक्षण हे सार्वत्रिक असलं पाहिजे, सर्वांना समान मिळालं पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यातून विषमता निर्माण होऊ नये”, असं बच्चू कडू म्हणाले.
“आमच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत या संदर्भात पाच ते सहावेळा व्हीसी द्वारे बैठका झाल्या आहेत. उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात याव्या, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे”, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे अमरावतीत बोलत होते. बच्चू कडू यांनी दिलेल्या माहितीनंतर जानेवारी महिन्यापासून सर्व शाळा सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.