जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर जळगावच्या जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याचे नोटिफिकेशन काढले आहे. यात संचारबंदीचे सर्व नियम दिलेले आहेत. जाणून घ्या याबाबतची पूर्ण माहिती.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत राज्यात संचारबंदीची घोषणा केली. यानंतर लागलीच जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील संचारबंदीची माहिती देण्यात आली. या पत्रानुसार संचारबंदी खालीप्रमाणे असणार आहे.
फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये आदेश
आदेश :-
_ ज्याअर्थी, उपोद्घातात नमूद सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च, 2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2.3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.
आणि ज्याअर्थी, जागतीक आरोग्य संघटनेने करोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेला आहे. तसेच करोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात गतीने पसरत आहे असे दिसून येत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाण संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे आणि या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याने, त्याकरीता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि अशी उपाययोजना फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 च्या तरतूदींच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणारी वाहने यांना जळगांव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगांव जिल्हयातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करणे जरुरीचे आहे. अशी माझी खात्री झालेली आहे. |
त्याअर्थी, मी. डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जळगांव मला प्रदान
करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जळगांव जिल्हयात करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.’
1. जळगांव जिल्हयातील सर्व सिमा तात्काळ बंद करण्यात येत आहे.
2. पोलीस अधिक्षक जळगांव व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगांव यांनी संयुक्तरित्या जळगांव
जिल्हयातील सर्व सिमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करुन वाहनांची तपासणी करुन त्यांना प्रवेश व निर्गमन करण्यास प्रतिबंध करावा.
3. जिल्हयातील कोणत्याही नागरीकास अत्यावश्यक कारण वगळता बाहेर जिल्हयात जाण्यास मनाई
करण्यात येत आहे.
4. जिल्हयातील नागरीक नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस जिल्हयात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश
करण्यास मनाई करण्यात येत आहे.
सदरचा आदेश हा खालील बाबतीत लागू होणार नाही.
1. शासकीय/निमशासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन वाहने.
2. अत्यावश्यक व जिवनावश्यक वस्तू / सेवा / मनुष्यबळ पुरविणारी वाहने व वाहतूक व्यवस्था, उदा. पिण्याचे पाणी, दुध, फळे, भाजीपाला, औषधी, धान्य , वैद्यकीय उपकरणे, टेलीफोन व इंटरनेट सेवा, हॉस्पिटलसाठी आवश्यक असणारे साधन सामुग्री इत्यादी व त्तसम वस्तू व सेवा (वाहनांच्या दर्शनी भागात आवश्यक ते स्टिकर / बोर्ड लावणे बंधनकारक राहील).
3. प्रसार माध्यमांची वाहने.
4. विद्युत विभागाशी संबंधित उपकरणे, पेट्रोल, गॅस, डिझेल इत्यादी पुरविणारी वाहने व वाहतूक व्यवस्था.
सदरचा आदेश हा सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्यामुळे एकतर्फी पारीत करण्यात येत आहे.
सदरचा आदेश हा आज दिनांक 23/03/2020 रोजी माझ्या सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला
असे.
(डॉ. अविनाश ढाकणे)
जळगाला जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जळगांव
प्रत :- माहितीसाठी सविनय सादर
1. मा अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय मुंबई
2. मा विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक
प्रत :- माहितीसाठी व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी
1. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगांव
2. पोलीस अधिक्षक जळगांव
3. आयुक्त, जळगांव शहर महानगरपालिका जळगांव
4. उपविभागीय दंडाधिकारी सर्व
5. कार्यकारी दंडाधिकारी सर्व
6. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगांव
7. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव
8. जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगांव
9. मुख्याधिकारी सर्व (नगरपालिका/नगरपंचायत)
10. विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, जळगांव
प्रत :- म. संचालक, येरवडा कारागृह, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, पुणे यांनी सदरील आदेशाचे शासकीय ।
राजपत्रात प्रसिध्दी देऊन त्याची दोन प्रती या कार्यालयास पुरविण्यात याव्यात.
प्रत :- जिल्हा माहिती अधिकारी जळगांव यांनी सदरील आदेशाचे जिल्हयातील सर्व स्थानिक वर्तमानपत्रात
विनामुल्य प्रसिध्दी देण्याबाबतची कार्यवाही करावी.