जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ३ मार्च हा दिवस जागतिक श्रवण दिन अर्थात वर्ल्ड हिअरींग डे असतो. त्यानिमित्त डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागातर्फे शुक्रवार ३ मार्च रोजी श्रवणदोष शस्त्रक्रिया, ऑडिओमेट्री व बेरा तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी इएनटी विभागप्रमुख डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.विक्रांत वझे, डॉ.पंकजा बेंडाळे, डॉ.तृप्ती भट यांच्यासह तज्ञ ऑडिओलॉजिस्ट डॉ.गौरव पाटील हे रुग्णांची तपासणी करणार आहे. झिरो रजिस्ट्रेशन चार्जेसवर प्रथम येणार्या २० रुग्णांची ऑडिओमेट्री तर लहान बालकांसाठी आवश्यक असलेल्या बेरा तपासणीचा प्रथम ५ रुग्णांना लाभ दिला जाणार आहे. तसेच प्रथम येणार्या ५० रुग्णांवर श्रवणदोष निवारण्यासाठी आवश्यक शस्त्रक्रिया देखील केल्या जातील. या उपक्रमात सहभागींपैकी ज्यांना श्रवणयंत्राची आवश्यकता आहे, त्यांना सवलतीच्यादरात श्रवणयंत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी इएनटीचे निवासी डॉ.बासू यांच्याशी ८९९९८ १६३७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक श्रवण दिन हा एक आरोग्य सेवा कार्यक्रम आहे जो ३ मार्च रोजी श्रवणशक्ती कमी झालेल्या रुग्णांना एकत्र आणण्यासाठी आणि कान आणि ऐकण्याच्या काळजीला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच स्थिती, निदान आणि उपचारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो. ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी हा उपक्रम घेत असून लाभ घ्यावा.
– डॉ.अनुश्री अग्रवाल, विभागप्रमुख, कान-नाक-घसा विभाग