जळगाव- जागतिक वन दिनानिमित्त जळगाव वनपरीक्षेत्र कार्यालय परिसरात विवीध प्रजातीचे रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
जागतिक वन दिनानिमित्त जळगाव वनपरीक्षेत्र तसेच विविध परिसरात विविध रोपांची लागवड करण्यात येऊन त्याचे संवर्धन करण्याची सर्व कर्मचारी वर्गाने घेतली. या रोपांचे भटक्या जनावरांपासून संरक्षणासाठी संरक्षक जाळी तसेच वेळोवेळी पाणीपुरवठा करीत जोपासना करण्यात येणार असल्याचे जळगाव वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के.थोरात यांनी सांगितले. यावेळी वनपाल जी.एस. चौधरी, जी.आर.चिंचोले, पी.ए.सोनवणे, सी.व्ही,पाटील, एच.बी.थोरात, वाय.आर.पाटील, मुकेश साळुंखे, के.जी. याग्निक आदी उपस्थित होते.
जागतिक वन दिनानिमित्त रोपांची लागवड
3 years ago
No Comments