यावल , प्रतिनिधी | यावल येथील मराठा विद्या प्रसारक महाविद्यालय आयोजित जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कु. अश्वीनी पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला.
यावल येथील मराठा विद्या प्रसारक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी वन्यजीव सप्ताहानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्राण्यांशी संबंधित विषयाच्या अनुषंगाने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये ज्यामध्ये डिजिटल/ई- पोस्टर, प्रश्नमंजुषा, चित्रकला व रांगोळी स्पर्धा यांचा समावेश होता. या स्पर्धेत कु. अश्विनी विनोद पाटील यांनी प्रथम तर यद्निका किशोर जावळे द्वितीय व , कु. जयश्री प्रकाश धनगर तृतीय क्रमांक पटकवला. या स्पर्धेत विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व व कर्मचारी आदींनी सहभाग नोंदविला. यामाध्यमातून प्राण्यांविषयी माहिती देण्यात आली. डिजिटल पोस्टर स्पर्धेत यद्निका महाजन प्रथम तर नीरज पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच चित्रकला स्पर्धेत निखिल सुतार, गणेश पाटील अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय. व निबंध लेखन स्पर्धेत पियूष वानखेडे प्रथम तसेच गणेश पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावले आहे. सदर उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवशास्त्र विभागाचे प्रा. मयूर सोनावणे, प्रा. मोहिनी पाटील आणि संगणक विभागाचे प्रा. ईश्वरलाल पाटील आदींनी परिश्रम घेतले.