जागतिक आदिवासी दिनानिमित्त पाड्यावर पौष्टीक आहारचे वाटप

यावल,  प्रतिनिधी । येथील आदिवासी युवकांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिवस क्रांती दिनाचे  औचित्य साधुन आदिवासी वस्तीवर गोरगरीब चिमकुल्या बालकांना पौष्टीक आहाराचे वाटप करण्यात आले.

यावल शहराला लगत असलेल्या गोळीबार या आदिवासीवस्तीवर आदिवासी तरुण समाजसेवक जावेद तडवी, यावल पंचायत समितीचे संगणक संचालक मिलींद कुरकुरे, महेरबान तडवीसह विक्की वानखेडे आदींनी गोळीबार टेकडीवर जावून बालकांना खाऊचे वाटप केले. मोलमजुरी करुन आपल्या कुंटुंबाचा उदर र्निवाह करणारे गोरगरीब व गरजू आदिवासींच्या मुलांना सामाजिक  कर्तव्याची जाणीव ठेवुन विविध प्रकारची पौष्टीक आहारचे गोळीबार टेकडीवर जावुन वाटप केले.  या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या  बांधवांना जागतिक आदिवासी  क्रांती दिन होते याची साधी कल्पना देखील नव्हती हे विशेष म्हणावे लागेल. दरम्यान जाविद तडवी या तरूणांने कुठल्याही शुभेच्छा फलकाकडे किंवा इतत्र होणाऱ्या खर्चाकडे न वळता सामाजिक बांधीलकी जोपासत या वस्तीवर जावून  चिमुकल्यांना  पौष्टीक खाऊचे वाटप केले. यावेळी बालकांचे चेहरे हे आनंदाने व हास्याने फुलले तर बालकांचे  कुटुंब हे क्षण पाहुण भारावुन गेलीत. जाविद तडवी व त्यांच्या सहकार्यानी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आदीवासी बांधवांनी आभार मानले .

 

Protected Content