जळगाव सी.ए. शाखेतर्फे “गौ सेवा व वृक्षारोपण” संपन्न (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सी.ए. शाखेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पांजरापोळ गौशाळा येथे गौ सेवा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

जळगाव येथील नेरीनाका येथील पांजरापोळ गौ शाळेत “सामुहिक गौसेवा एक अनुष्ठान” यासाठी गौ सेवाव्रती अॅड. श्री. विजय काबरा यांच्या सोबत सनदी लेखापाल जळगाव जिल्हा शाखेतर्फे गौसेवा सव्वामणी खाऊ घालून संपन्न करण्यात आली.  त्यादरम्यान उपस्थितांनी दिलेल्या गौ माता कि जय या घोषणांनी परिसर निनादून गेला. जळगाव सी.ए.शाखेचे अध्यक्ष सी. ए. विकी बिर्ला, सेक्रेटरी सी.ए. अभिषेक कोठारी, उपाध्यक्षा व विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षा सी. ए. ममता राजानी केजरीवाल, खजिनदार सी. ए. हितेश आगीवाल, कमिटी सदस्य सी. ए. रोशन रुणवाल व सी.ए. सोहन नेहेते तसेच जळगाव सी. ए. शाखेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी जळगाव सी.ए. शाखेतर्फे अॅड.  विजय काबरा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विजय काबरा यांनी “सामुहिक गौसेवा एक अनुष्ठान” या विषयावर सर्व सी.ए. सभासदांशी संवाद साधुन दैनंदिन आयुष्यातील गौसेवेचे महत्व समजावून सांगितले. त्यानंतर सी. ए. शाखेच्या व्यवस्थापन समितीमार्फत वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी जळगाव सी.ए. शाखेचे ज्येष्ठ सभासद सी. ए. एच. एन. जैन व सी.ए. आर. डी. जैन यांची सुद्धा उपस्थिती लाभली. याप्रसंगी आय.सी.ए.आय.चे सर्वात मोठे राष्ट्रीय आर्थिक आणि कर साक्षरता अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत जन जागरूकता करण्यासाठी पद यात्रेचेही आयोजन करण्यात आले होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/5202066729840424

 

Protected Content