जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला मोलाची मदत म्हणून सामाजिक संघटनांतर्फे आज शनिवार १० एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
अन्याय अत्याचार निर्मूलन समिती व जनमत प्रतिष्ठान, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान,अरुणाई बहुउद्देशीय संस्था यांचा संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहराचे नवनिर्वाचित महापौर जयश्रीताई महाजन व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष सुचित्राताई महाजन, मनीषा पाटील यांची प्रमुख उपस्थितीती होती. ह्या वेळी साहिल पटेल, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, किरण वाघूळदे, राहुल कोळी, रोहन महाजन, सलमा पठाण, किरण कोलते, संजय सिंग, राजेंद्र वर्मा, वासुदेव पाटील, सागर कोळी आदी उपस्थित होते. आभार हर्षाली पाटील यांनी मानले.