जळगाव प्रतिनिधी । महाविद्यालयात कायमस्वरूपी नोकरी असल्याचे भासवून लग्न करून फसवणूक करत जळगाव येथील माहेरवाशीनीचा तीन लाखासाठी अमानुष छळ करणाऱ्या औरंगाबाद येथील पतीसह चौघांवर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २५ वर्षीय तरूणीचा विवाह औरंगाबाद येथील संभाजी नगरात राहणारा पियुष हरीदास बावस्कर यांच्याशी ९ जानेवारी २०२१ रोजी झाला. लग्नापुर्वी पती एका संस्थेत कायमस्वरूपी, कमी वय दाखवून आणि निव्यसनी असल्याचे सांगून लग्न केले. लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून पती पियुष बावस्कर हा दारू पिऊन घरी आला याबाबत विचारणा केली असता शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. पतीचा मोबाईल चेक केला असता इतर महिलांशी चॅटींग व बोलणे सुरू असल्याचे लक्षात आले. तसेच अनैसर्गीक पद्धतीने संबंध करण्यास सुरूवात केली. याला विरोध केला असता शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत सासु वासंती हरीदास बावस्कर, सासरे हरीदास खंडू बावस्कर आणि चुलत सासरे शंकर खंडू बावस्कर यांनी देखील पाठबळ दिले. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहितेने वडील व नातेवाईकांना बोलावून त्यांच्यासोबत माहेरी निघून आल्या. माहेरी आल्यानंतरही पती यांनी विवाहितेच्या नाईवाईकांशी भेट घेवून भडकविण्याचे काम केले. याप्रकरणी विवाहितेने जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून पतीविरूध्द तक्रार दाखल केली. याप्रकरणी तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.