जळगाव, प्रतिनिधी । शहर महानगरपालिकेच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन करण्यात आले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला अपर आयुक्त विद्या गायकवाड यांनी पुष्पहार अर्पणकरून अभिवादन केले. याप्रसंगी मनपा नगर सचिव सुनील गोराणे, राजेंद्र सुलाखे, .कोल्हे व कर्मचाऱ्यांचे उपस्थित होते.