Home Cities जळगाव जळगाव महापालिकेच्या वतीने स्वराज्य रॅली उत्साहात (व्हिडीओ)

जळगाव महापालिकेच्या वतीने स्वराज्य रॅली उत्साहात (व्हिडीओ)

0
169

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आज बुधवारी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव महापालिकेच्या वतीने स्वराज्य रॅली काढण्यात आली. महापौर जयश्री महाजन यांनी हिरवी झेंडी दाखविल्यावर रॅलीची सुरूवात करण्यात आली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १७ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अमृत महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव महापालिकेसमोरून स्वराज्य रॅली काढण्यात आली. महापौर जयश्री महाजन यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता. राष्ट्रभक्तीपर गितांचे आयोजन करून रॅली काढण्यात आली. ही रॅली महापालिका आवारातून निघाली, त्यानंतर नेहरू चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, कोर्ट चौक, गोलणी मार्केट, चित्रा चौका, शास्त्री टॉवर चौक आणि पुन्हा महापालिका अशी काढण्यात आली.

यावेळी या रॅलीत महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, माजी महापौर सिमा भोळे, नगरसेविका पार्वताबाई भील, गटनेते भगत बालाणी, उपायुक्त प्रशांत गोसावी यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound