जळगाव प्रतिनिधी । येथील महापालिकेच्या आयुक्तपदी सतीश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली असून आज शासनातर्फे याचे आदेश निघाले आहेत.
गत सुमारे दीड महिन्यापासून जळगाव महापालिकेचे आयुक्तपद रिक्त होते. या पार्श्वभूमिवर, आज या पदावर सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. ते सध्या नगर परिषद प्रशासन संचलनालयात उपसंचालक म्हणून कार्यरत होते. आज त्यांची जळगाव महापालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. नगरविकास खात्याचे उपसचिव कैलास बघान यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळतील अशी अपेक्षा आहे.