Home आरोग्य जळगावात बिलासाठी नातेवाईकांना मृतदेह देण्यास टाळाटाळ

जळगावात बिलासाठी नातेवाईकांना मृतदेह देण्यास टाळाटाळ

0
29

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणपती हॉस्पिटलमध्ये गेल्या १४ दिवसांपासून कोराना बाधित ४५ वर्षीय व्यक्तीचा आज मृत्यू झाल्याने बिलासाठी प्रशासनाकडून मृतदेहाची अडवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे रूग्णालयाच्या आवारात आज सकाळी तणाव निर्माण झाला होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांच्या मध्यस्थीने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरीत काम करणारे कर्मचारी यांची तब्बेत गेल्या २० दिवसांपुर्वी बिघडल्याने त्यांना भुसावळात कोरोनाची टेस्ट घेतल्याने ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना जळगावातील गणपती हॉस्पिटलमध्ये ११ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले. गेल्या १४ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, नातेवाईकांना प्रकृतीबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही. २४ सप्टेंबर रोजी दुपार ४ वाजता रूग्णाचा मृत्‍यू झाला. रूग्णाचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती प्रशासनाला विचारले असता उडवीउडवीची उत्तरे देण्यात आली. बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देता येणार नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मृतदेहा घेण्यास आलेले नातेवाईकांना १ लाख ११ हजार रूपयांचे बिल दिल्याशिवाय मृतदेह देणार नसल्याचे सांगितल्यानंतर आगोदरच अडीच लाख रूपये ऑनलाईन भरले आहे. त्यामुळे अजून पैसे देवू शकत नाही असा पवित्रा घेतला. दरम्या याप्रकारामुळे या वातावरणामुळे तणाव निर्माण झाला होता. नोडल ऑफिसर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्याशी नातेवाईकांनी संवाद सांधल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.


Protected Content

Play sound