जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात जळगाव बारदान व्यापारी असोसिएशनच्या वतीने बारदान शिलाई कामगारांच्या मागण्यांच्या विरोधात आज सोमवारी ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बारदान व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या वतीने भाववाढ संदर्भात मागण्या मान्य न झाल्याने सात जानेवारीपासून कामकाज बंद केले होते. या संदर्भात कामागार संघटनेच्या वतीने जळगाव बारदान व्यापारी असोसिएशनला निवेदन देण्यात आले होते. यामध्ये जोपर्यंत दरवाढ संदर्भात चर्चा होणार नाही, तोपर्यंत हे काम बंद राहणार आहे, असा पवित्रा शिलाई कामगारांनी घेतला होता. दुसरीकडे कामागारांच्या दरवाढीच्या मागण्यांच्या विरोधात सोमवारी ९ जानेवारी रोजी जळगाव बारदान व्यापारी असोसिएशनच्या वतीने बारदान शिलाई कामगारांनी केलेल्या मागण्यांच्या विरोधात दुकाने बंद ठेवून आंदोलन पुकारले आहे. बारदान शिलाई कामगारांना थोडी का होईना, दरवाढ करूनही त्यांच्या अडमुठे पणामुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत जात आहे. जळगाव बारदान व्यापारी असोसिएशन आणि जळगाव जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटना यांनी एकत्र बैठक घेऊन मध्यस्थी तोडगा करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे देखील बारदान व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे..




