जळगाव प्रतिनिधी । राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये येथील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ५ लाख लाखांची मदत जाहीर केली. आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात आला.
प्रत्येकाने आपल्या आर्थिक कुवतीनुसार कोरोनाग्रस्तांसाठी जमेल तशी मदत करून खारीचा वाटा उचलावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केले. कृउबा सभापती कैलास चौधरी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख रुपयांचा धनादेश नुकताच सुपूर्द केला. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीने ५ लाखाचा निधी दिल्याने पालकमंत्री या नात्याने ना. गुलाबराव पाटील यांनी आभार मानले आणि दानशुर व्यक्ती व संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी असेही आवाहन पालकमंत्री ना. पाटील यांनी केले आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी कृउबा समितीचे सभापती कैलास चौधरी, उपसभापती सुरेश पाटील, संचालक पंकज पाटील, भरत बोरसे, अनिल भोळे, वसंत भालेराव, मनोहर पाटील, प्रविण भंगाळे, संतोष नारखेडे, मुरलीधर पाटील, मच्छींद्र पाटील, प्रशांत पाटील, नवलसिंगराजे पाटील आदी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००